प्रज्वला योजनेची चौकशी होणार- मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई : राज्य महिला आयोगामार्फत प्रज्वला योजना महिला सक्षमीकरणासाठी व उल्थानासाठी राबविण्यात आली होती. तसेच समितीच्या अहवालानंतर सत्यता पडताळून दोषींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या प्रज्वला योजनेबाबत डॉ. मनीषा कायंदे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये प्रज्वला योजनेबाबत कॅगच्या अहवालात ओढले ताशेरे गेले.

राज्य महिला आयोगामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पीडीत महिलांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठीव स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे या गोष्टीशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगामार्फत ‘प्रज्वला’ या नावाने महिला सक्षमीकरणासाठी सर्व महिला बचत गटातील महिलांकरिता जून, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्त्रियांच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे या आयोगाच्या महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता महिला बचत गट प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत, असेही मंत्री ठाकूर यांनी सांगितले.

Share