आदित्य ठाकरेंचा फज्जा उडवण्यात राऊत यशस्वी पडळकरांचा घणाघात

मुंबई : भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे. संजय राऊत उत्तरप्रेदश व गोवा निवडणुकीत तुमच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पुरता फज्जा उडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना एक टोपणनाव मिळवून दिले. तशीच तुमची काही सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबतीमध्ये दिसतेय. अशी टिका पडळकर यांनी केली आहे.

पडळकर यांनी पुढे म्हटले आहे की, संजय राऊतांच्या माहिती करिता सांगतो जेव्हा लाल चौकात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये’ अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता. तर सुरक्षा व्यवस्थेबाबत पडळकर म्हणाले की, राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.

शेतकऱ्यांच्या वीजतोडणी विरोधात गोपिचंद पडळकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली. ऊर्जांमंत्र्याच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. संजय राऊत यांनी यावर कधीतरी एखादा लेख लिहावा अशी टिकाही पडळकरांनी केली आहे.

Share