Goa Assembly Elections 2022: शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गोवाः पाच राज्यांच्या निवडणुका केंद्रीय आयोगाने जाहीर केल्यानंतर गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने आज ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  १२ जागी निवडणुक लढणार असून ही माहिती शिवसेना खा. संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत  दिली. या दरम्यान त्यांना  उमेदवारांची नावे घोषीत केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. सेना गोवा निवडणुकीत साधारण १२ जागा लढणार आहे. आज ९ उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी सेना निवडणूक लढवणार आहे. तसेच उद्यापर्यंत तीन जागांची घोषणा करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्या-त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून आज ९ जागांची यादी जाहीर करत आहोत. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.  महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. गोव्याच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, अशी मला खात्री आहे.

शिवसेनेचे उमेदवार
पेडणे – सुभाष केरकर
म्हापसा – जितेश कामत
शिवोली – विन्सेंट पेरेरा
हळदोणे – गोविंद गोवेकर
पणजी – शैलेंद्र सुभाष वेलिंगकर
पर्ये – गुरुदास गावकर
वाळपई – देवीदास गावकर
वास्को – मारुती शिरगावकर
केपे – एलेक्सि फर्नांडिस

Share