औरंगाबादेत कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा ? आणखी एका तरूणाचा खून

औरंगाबाद- शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कधी चोरी तर कधी खून नेमक शहरात चालू काय आहे?  शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही का ? आणि असेल तर असे भयंकर प्रकार शहरात कसे घडू शकतात? अशा अनेक प्रश्नांमुळे औरंगाबादकर त्रस्त असतील.

नूकतच पोलिसांनी हसन साजेद पटेल याच्या खूनाचा उलगडा केला आहे. त्यातच आज आणखी एकाचा धक्कादायक पध्दतीने खून केला आहे. टि.व्ही.सेंटर भागात तरुणाच्या डोक्यात दगड घालून  इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी चक्क गुप्तांग जाळले आणि मृतदेह देखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी समोर आला आहे.

सिद्धार्थ भगवान साळवे (वय ३२, वर्षे रा. सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर) असे त्या मृताचे नाव असून खूना मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेला आहे. तर गुन्हा दाखल कराण्यासाठी नातेवाईक सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत

Share