भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण

मुंबई- भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला करोनाची लागण झाली असून त्याने स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी विलगीकरणात ठेवले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकर त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी . तसेच  कृपया सुरक्षित राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे हरभजनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हरभजनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याला भविष्यात पंजाबची सेवा करायची आहे असेही मत त्यांने व्यक्त केले होते. तेव्हापासून तो राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याने अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही.

Share