लातूर : तब्बल दोन वर्षानंतर लातूर जिल्ह्यात काल एकही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, ही बाब जिल्हावासीयांसाठी मोठी दिलासादायक मानली जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न येण्यामागे मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण आणि जिल्ह्यातील नागरिक करत असलेले कोरोना नियमांचे पालन तसेच आरोग्य यंत्रणेने केलेल्या अथक प्रयत्नाचे फलित असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पुथ्वीराज बी. पी. यांनी केले.
लातूर मध्ये बुधवारी २२४ नमुन्यांध्ये चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगोटिव्ह आले असून मागच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदा जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी लसीकरण केंद्रावर जावून आपले लसीकरण करुन घ्यावे. अजूनही कोविड पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळू या, अजूनही त्रिसुत्रीचे पालन करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लातूर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.