शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. नाशिकमध्ये कांदा परिषदेत बोलताना दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत पडळकरांनी शरद पवारांवर टिका केली.

‘दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत. इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या XXXवर लाथ घाला असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाचे पालन करणार का? उद्धव ठाकरे सध्या रिमोट कंट्रोलवर काम करत आहेत, अशी टीकाही पडळकरांनी केली.

चौंडीतही शरद पवारांवर बोचरी टीका

नातवाला लॉन्च करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शरद पवार यांनी चौंडीत येऊन राजकारण केलं. राजकारणासाठी प्रेरणास्थळाचा वापर कसा काय करता, आम्ही याला कडाडून विरोध करु. मल्हारराव होळकर मुघलांच्या छाताडावर नाचले होते. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडलं होतं. पवारांना सांगू इच्छितो पोलीस बळाचा वापर करुन तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार पवार आणि रोहित पवार यांच्यावर केली होती.

Share