चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

थंड गुणधर्म असले तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीने खाल्ल जाणारे फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळते. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करते. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवते जाणून घेऊया काय आहेत चिकू खाण्याचे शरीराला फायदे. थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणे आवश्यक आहे.

चिकू खाण्याचे फायदे

 • बी व्हिटॅमिनयुक्त असल्याने फायदेशीर

  चिकूमध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन बी असते. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने उत्तम आरोग्यासाठी चिकू खावा. या फळाचे रोजच्या आहारात योग्य ते प्रमाण असणे आवश्यक आहे. अॅनिमिया, ताण, डोळ्याचे विकार यांसारख्या समस्यांवर चिकू खाणे अतिशय फायदेशीर ठरते.

 • प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

  शरीरातील उर्जा वाढण्यासाठी चिकू अतिशय उपयुक्त असतो. छोट्या दिसणाऱ्या या फळात व्हिटॅनिम सी असते. लहान मुलांनी आणि ज्येष्ठांनी चिकू आवर्जून खायला हवा. शरीरातील अँटीऑक्सिडंटसची पातळी चांगली ठेवण्यासाठी चिकू उपयुक्त ठरतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास चांगली मदत होते. शरीरावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही समस्येशी नैसर्गिकपणे सामना करण्याची ताकद चिकूमुळे वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून आपले संरक्षण होते.

 • जळजळ होण्यास प्रतिबंध

  अनेकांना विविध कारणांनी छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो. गोळ्या औषधे घेण्यापेक्षा चिकू खाणे हा सोपा आणि घरगुती उपाय आहे. त्यामुळे आहारात चिकू आवर्जून खा.

 • हाडांच्या मजबूतीसाठी

  हाडे मजबूत होण्यास चिकूतील घटक उपयुक्त असतात. कॅल्शियमबरोबरच चिकूमध्ये फॉस्फरस आणि लोह यांसारखी आरोग्याला आवश्यक असणारी महत्त्वाची खनिजेही असतात. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी चिकू एक उत्तम फळ आहे.

Share