मोठी बातमी ! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे

दिल्ली-  विधानसभेत गदारोळ केल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.  याप्रकरणी आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज  सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिली आहे.  या १२ आमदारांचं निलंबन कोर्टाने रद्द केलं असून  कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं आहे .

नेमक प्रकरण काय-

५ जुलै रोजी  ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावा वेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.

Share