एसटी कर्मचाऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कामावर रुजु होण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत हायकोर्टाने आज महत्वाचा निकाल दिला आहे. येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र, हे आदेश देतानाच कोर्टाने राज्य सरकारलाही सुनावलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती वेतन देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आम्ही अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे आता कामगारांनी किंतु, परंतु करू नये. संप करू नये असं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं.

यावेळी कोर्टाच्या बाहेर आल्यावर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल, आम्ही संप करणार नाही. पण एकही आत्महत्या होणार नाही. एकही विधवा होणार नाही याची जबाबदारी घेण्यास सरकारला सांगा, “हे प्रकरण वैद्यकीय विद्यार्थ्यांचा किंवा बँक कर्मचाऱ्यांचा संप नाही, इथं 124 लोकांनी वीरमरण पत्करलेलं आहे. त्या अनुषंगाने कोर्टाने विचार करावा, अशी विनंती आम्ही कोर्टाला केली. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ज्या ब्रेकिंग न्यूज माध्यमांवर चालतात, त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत. त्या थांबवण्यासाठी न्यायालयाने विचार करावा.”, अशी बाजू मांडली. ”आम्ही राज्य सरकारचं 25 मार्च रोजीचं सर्क्युलर दाखवलं. न्यायालयात सांगितलं की, सरकारच्या या परिपत्रकानुसार 25 ते 30 वर्षे जरी नोकरी केली, त्यांना आता नवनियुक्ती देण्यात येणार होती. त्यावर, न्यायाधीशांनी हे चालणार नाही असं सांगितलं.” त्यामुळे, ही मोठी उपलब्धी असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं.

Share