राज ठाकरे घेणार ९ एप्रिलला सभा, जागा बदलुन पोलिसांनी दिली परवानगी

गडकरी रंगायतन नाटक चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी या जागेची पाहणी देखील केली होती. दरम्यान या दिवशी हिंदी भाषा एकता परिषद आणि स्थानिक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संध्याकाळी ७.३०वाजता गडकरी रंगायतन मध्ये २८वे राष्ट्रीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालक मंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. याशिवाय सभेमुळे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, त्यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चोका एवजी शहरातील हायलंड मैदान आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हे दोन पर्याय सुचवले आहेत. परंतु डॉ.मुस रोड येथे सभा घेतली जाईल असा चंग मनसेने दिला होता.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हायलंडआणि घाणेकर नाट्यगृह न करता गजानन महाराज चौक रस्ता सभेसाठी द्वावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. अखेर त्या रस्त्यावर सभा घेण्यासाठी पोलिसांनी मंजुरी दिली, अशी माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे त्यामुळे आता येत्या 9 एप्रिल रोजी राज ठाकरे विरोधकांचा या सभेच्या निमित्ताने समाचार घेणार असून सभेला उत्तरपूजा असे नाव देण्यात आले आहे.

Share