साऊथचे पाच नवीन चित्रपट धुमाकूळ घालणार

एक काळ होता भारतीय सिनेमा म्हणजे बॉलीवुड अस म्हटल जायच पण आता साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री बॉलीवुड मागे टाकत असल्याची चिन्ह दिसत आहेत ‘पुष्पा’ आणि ‘आरआरआर’ नंतर यावर्षी केजीएफ चॅप्टर २ ,आदिपुरुष,बीस्ट,सालार आणि आचार्य हे पाच चित्रपट रीलीज होणार आहेत. केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट १४  एप्रिल रीलीज होणार आहे. या चित्रपटाचा पहिला पार्ट २०१८ मध्ये रीलीज झाला होता. त्यावर्षी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती आणि आता या चित्रपटाचा दूसरा पार्ट ही चांगली कमाई करणार असा अंदाज वर्तवला जात आहे. बाहुबली फेम प्रभासचे ‘सालार’ आणि ‘आदिपुरुष’ हे दोन चित्रपट रीलीज होणार आहेत. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १२  जानेवारी२०२३  ला म्हणजेच पुढच्या वर्षी रीलीज होऊ शकतो. या चित्रपटात प्रभास सोबतच सैफ अली खान आणि कृति सेनन दिसणार आहेत. साऊथ इंडियन सुपरस्टार विजयच्या ‘बीस्ट’ या चित्रपटचही ट्रेलर रीलीज झालय, हा चित्रपट १३  एप्रिलला रीलीज होऊ शकतो. त्यामुळे के जीएफ आणि बीस्ट हे दोन चित्रपट एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत.राम चरण परत एकदा आचार्य या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो कारण त्याचा हा चित्रपट २९ एप्रिलला रीलीज होणार आहे.

https://www.instagram.com/reel/CcAJTfGgCcS/?utm_medium=copy_link

Share