नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई :   दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदी चित्रपट झुंड या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शीत झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. ४ मार्च २०२२ रोजी झुंड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांनी टीझर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CZtHnpIoSX_/?utm_source=ig_web_copy_link

टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे प्रशिक्षकाच्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा ‘अँग्री यंग मॅन’ अंदाज या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असा अंदाज अनेकांनी टीझर पाहून लावला आहे. टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलांची टीम देखील दिसत आहेत. ही पूर्ण टीम चार मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Share