‘कॅन्सरशी लढत होते मी, पण…’ यामिनी जाधव यांचा भावनिक व्हिडिओ ट्विट

गुवाहाटी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांची साथ सोडून मंत्री एकनाथ शिंदे सोबत जाणाऱ्या आमदारांची कारण समोर येताना दिसत आहेत. भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरवरुन आपल्या भावपूर्ण प्रसंग सांगितला आहे.

यामिनी जाधव काय म्हणाल्या?

गेल्या काही दिवसांतील घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. आम्हीच अजूनही शिवसैनिक आहोत, पुढील काळातही राहणार आहोत, हे जगही शिवसैनिक म्हणून सोडू, असं यामिनी जाधव म्हणाल्या. यशवंत जाधव हे ४३ वर्ष शिवसेनेत आहेत, वयाच्या १७ वर्षांपासून शिवसेनेत आहोत. अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचणी आल्या निवडणुका हराव्या लागल्या, असं आमदार यामिनी जाधव म्हणाल्या.

गेले काही महिने ऑक्टोबरपासून कॅन्सर नावाचं वादळ आलं. आम्हाला हे समजलं त्यावेळी संपूर्ण कुटुंब तुटलं. कॅन्सर झाल्याची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षनेतृत्वाला दिली होती. एक महिला आमदार म्हणून माझ्या घरी काही नेते येतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरनं त्रस्त आहेत हिच गोष्टी मोठी हालवणारी होती. कुटुंब, भायखळा मतदारसंघातील शिवसैनिकांनी खूप साथ दिली. माझी विचारपूस केली जाईल, साथ दिली जाईल, अशी अपेक्षा होती. किशोरीताई पेडणेकर माझ्या घरी आल्या आणि मला सूचना केल्या. पण, ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी कुणीही माझी विचारपूस केली नाही, अशी खंत यामिनी जाधव यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना यमिनी जाधव म्हणाल्या, मी स्वत: २०१२ पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झालेला पाहिला आहे, त्यांच्या पत्नी सारखी माझी मरणाशयी अवस्था होणं गरजेचं होतं मग माझ्या पक्ष्यातील नेते मला बघायला आले असते का? गेल्या सात आठ महिन्यांपासून आम्हाला सूचना दिल्या नाहीत, हातभार लावला नाही. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, बऱ्याच दिवसांपासून हे सुरु होतं. मनाला आजही यातना होत आहेत, पण शिवसेना पक्ष सोडून आम्ही दुसरा पक्ष अजूनही यशवंत जाधव आणि यामिनी जाधव स्वीकारलेला नाही. भायखळा विधानसभेतील शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव शिवसेनेविरोधात जाणार नाहीत, त्यामागं काही कारणं आहेत ते शोधणं गरजेचं आहे, असं यामिनी जाधव म्हणाल्या.

Share