ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या शिवाजी पार्कात

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या अटकेवरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ईडीला थेट आव्हान दिलंय. ईडीला सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या आम्हीही सर्व येतो असे ट्विट केले आहे.

यशोमती ठाकुर यांनी  ट्विट करत म्हटलं की, ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असा दावा करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेलेत तर काही सुपात आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्चला शेवटचं मतदान झालं की, कारवाई सुरू होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यातच यशोमती ठाकूर यांनी १७० चा आकडा आणखी बदललेला असू शकतो, असं म्हटलं आहे.

Share