महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आंदोलन छेडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काल मनसेचे नेते बाळा नांदगावकर पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सुरक्षित आहे. इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमक्यांचे पत्र रोज येतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ची सुरक्षा द्यायला समर्थ आहे. ही स्टंटबाजी सोडून द्या. कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तर येथील सरकार तुमच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Share