आयपीएलमध्ये राजस्थानने धावत धावत केल्या चार धावा

टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांनी पळून चार धावा केल्या असल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. त्या सामन्यात राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी धावत चार धावा केल्या. डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली.

त्या षटकात उमेश यादवचा शेवटचा चेंडू बटलरने पॉइंटच्या दिशेने खेळला. त्या प्रदेशात उपस्थित असलेल्या व्यंकटेश अय्यरने शानदार फील्डिंग केले आणि डायव्हिंग करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून रोखला. मात्र, व्यंकटेश अय्यरचे प्रयत्न व्यर्थ गेले कारण जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी स्ट्रायकर एंटपर्यंत थ्रो पोहोचण्याआधीच धावून चार रन काढले.

आयपीएलच्या इतिहासात फलंदाजांनी एकही ओव्हरथ्रू न करता चार धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2017 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने चार धावा केल्या होत्या, मात्र यादरम्यान त्याला ओव्हर थ्रोमध्ये दोन धावा मिळाल्या होत्या.

 

Share