प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

मुंबई : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याचवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज  दाखल करत बंडखोरी केली होती. अर्ज मागे घेण्याच्या सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही प्रदीप सोळुंके यांनी आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे अखेर सोळुंके यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करुन सांगितलं की, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात विक्रम वसंतराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून अधिकृतरीत्या उमेदवारी देऊन “AA ” व “BB” फॉर्म देण्यात आले आहेत.

 

तसेच ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत. मात्र असे असतांना प्रदीप सोळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अर्ज भरला होता. काल शेवटच्या दिवशी सोळुंके यांना कळवूनही त्यांनी अर्ज मागे न घेता पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

Share