आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण ‘पंतप्रधान संग्रहालय’ लोकार्पण

दिल्ली : दिल्लीतील नेहरू म्यूजियम अँड लायब्ररी परिसरात देशातल्या आजवरच्या पंतप्रधानांचं एकत्रित संग्रहालय तयार करण्यात आलय. काल १४ एप्रिल रोजी हे संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल.

देशात केवळ मोजक्याच पंतप्रधानांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं, इतरांच्या कामाची मात्र तितकीशी दखल घेतली जात नाही, ती दखल घेतली जावी या उद्देशाने हे संग्रहालय बनवण्यात आलय. या संग्रहालयात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पासून आताच्या विद्यमान पंतप्रधानापर्यंतचा प्रवास आधुनिक तंत्रज्ञानानाच्या सहाय्याने दाखवला जात आहे. संग्रहालयात एकूण ४३ गॅलऱ्या आहेत. स्वातंत्र्यलढा संविधान मांडणी, आपल्या देशातील पंतप्रधानांनी विविध आव्हानांमधून देशासाठी केलेल नेतृत्व त्यामुळे झालेली देशाची प्रगती याच हे येथे बघायला मिळणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दरम्यान हे संग्रहालय आपल्या पंतप्रधानांचे जीवन आणि योगदान याद्वारे स्वातंत्र्योत्तर भारताची कथा सांगणार आहे. देशासाठी भारतातील सर्व पंतप्रधानांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीकोनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या  सर्वच पंतप्रधान येथे जागा देण्यात आली आहे.

पंतप्रधान संग्रहालयाची ठळक वैशिष्ट्ये

  • सामग्री परस्परसंवादी आणि आकर्षक पद्धतीने सादर करण्यासाठी संग्रहालय तंत्रज्ञान-आधारित इंटरफेस समाविष्ट करते.
  • पंतप्रधानांचे संग्रहालय संग्रहित साहित्य, वैयक्तिक वस्तू, संस्मरणीय वस्तू, पंतप्रधानांची भाषणे, त्यांच्या जीवनातील विविध पैलू, विचारसरणीचे किस्से हे सगळ थीमॅटिक स्वरूपात प्रतिबिंबित केलेल आहे.
  • राष्ट्र उभारणीसाठी भारताच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दूरदृष्टीने संग्रहालयाची संकल्पना तयार करण्यात आली आहे.
  • संग्रहालय म्हणजे भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांना श्रद्धांजली देणारी वास्तू आहे
  • पंतप्रधानांचे जीवन आणि योगदान याद्वारे स्वातंत्र्योत्तर भारताची कथा या संग्रहलयातून सांगितली जाणार आहे.
  • संग्रहालयाचा लोगो राष्ट्र आणि लोकशाहीचे प्रतीक असलेल्या धर्मचक्र धारण केलेल्या भारतातील लोकांच्या हातांचे प्रतिनिधित्व करते.

 

हे संग्रहलय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा सर्वसमावेशक प्रयत्न आहे. त्याचबरोबर या संग्रहालयाचा  उद्देश तरुण पिढीला आपल्या सर्व पंतप्रधानांचे नेतृत्व, दूरदृष्टी,देशाच्या नेत्यांविषयी जागरुक करणे आहे.

Share