राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

मुंबई : राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. चार महिन्यात राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम सोसायटी मासिक गेली अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि राज्याचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया. विविध क्षेत्रात राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येऊ, असेही ते म्हणाले. यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share