आंतरजातीय लग्न केलेल्या विवाहितेची रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या

औरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या 21 वर्षीय महिलेने शिवाजीनगर गेट नं.54 येथे रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, स्मिता गणेश म्हस्के (वय.21, रा.काबरानगर, गारखेडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी स्मिताने गणेश म्हस्के याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. गणेश आणि स्मिता हे दोघे कुटुंबासोबत काबरानगरमध्ये राहत होते. रविवारी रात्री गणेश आणि स्मिता यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे स्मिताने रागाच्या भारात घर सोडले होते.  तेव्हापासून कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मात्र ती सापडली नाही.  काल जवाहरनगर पोलीसांना रेल्वेसमोर उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती सदरील महिलेच्या घरच्यांनाही मिळाली. त्यांनी ओळख पटवून हा मृतदेह स्मिताचाच असल्याचे सांगितले.  शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करीत आहे.

Share