राणेंना दिलासा ! ठाकरे सरकारने राणेंविरोधातील याचिका मागे घेतली

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मागे घेण्यात आलेत. नारायण राणे यांनी ही नोटीस मागे घेण्यात यावी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला पालिकेने महाधिवक्त्यांच्या माध्यमातून, “आम्ही ही नोटीस मागे घेत आहोत,” असं सांगितलं आहे. नारायण राणेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांना हे बांधकाम हटवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता तो कालावधी उद्या संपणार होता.

काय आहे नेमकं प्रकरण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतल्या जुहू इथं अधिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेला मिळाली होती. तारा रोडवर असलेल्या या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दिली होती. यानंतर मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या पथकाने १८ फेब्रुवारीला अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि त्यानंतर नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती.  मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी दोनवेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली. आणि दुसऱ्यांदा नोटीसही पाठवली. यानंतर नारायण राणे यांनी या कारवाई थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Share