आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा नितीन राऊतांना टोला

मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर रोज  नवा विक्रम गाठत आहेत. त्यावर टिका करण महाविकास आघाडी काही सोडत नाही, अशातच राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ऊर्जामंत्र्यांना आधुनिक भास्कराचार्य म्हणत टोला लगावला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, २०१४ मध्ये गॅस सिलंडर ४१० रुपयांना मिळत होते, तेच आता २०२२मध्ये ९५० रूपयांना मिळत आहे. सात वर्षात हे दर ६४० रुपयांनी वाढले आहेत. याचं क्रेडिट घ्यायला ते कधी आले नाही असं ट्विट राऊतांनी केलं आहे. त्यावर प्रत्युत्तर देत भातखळकरांनी ट्विट शेअर करत म्हंटल आहे की, ९५० वजा ४१०, याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब? असा सवाल उपस्थित करत, विजेची बिलं अशाच मनमानी बेरजा वजाबाक्या करून भरमसाठ पाठवायची सवय लागली आहे असं म्हणत त्यांना आधुनिक भास्कराचार्य अशी पदवी देत टोला लगावला आहे.

Share