‘हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याची तयारी आहे का?’

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं आहे. हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का, असा सवाल दीपाली सय्यद यांनी ट्विट करत फडणवीसांना केला आहे.

दीपाली सय्याद यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं की, हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल. असं ट्विट दीपाली सय्याद यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी त्यादरम्यान कोणी समोर येऊन सांगितल्यास राजीनामा देतो, असं ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं होत. तसेच मुख्यमंत्र्यांनी शासकीय वर्षा निवासस्थान देखील सोडले.

Share