नातवाच्या वयाच्या आदित्य ठाकरेंच्या चपला उचलण्याची वेळ खैरेंवर आली- मनसे नेत्याची टिका

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेवर टिका केली होती. ज्यात ते म्हणाले होते की, मनसेला सभेसाठी लोक पैसे देऊन आणावे लागणार आहे. त्यांच्या याच टिकेला आता मनसे नेते तथा सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मनसे स्टाईल उत्तर दिले आहे.

दिलीप धोत्रे म्हणाले, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच पक्षातील स्थान अत्यंत डळमळीत झालं आहे. त्यांचे स्थान नेमक कुठे आहे, हे त्यांनाच माहिती नाही. या ज्येष्ठ नेत्यावर स्वतःच्या मुलगा, नातवाएवढ्या वयाच्या आदित्य ठाकरे यांच्या चपला उचलण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी चंद्रकांत खैरेंवर टिका केली आहे.

औरंगाबादमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या होत्या, त्याच ठिकाणी म्हणजेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद महापालिकेला यंदा मनसे आव्हान देणार की काय, अशी चर्चा आहे. त्या अनुशंगाने शिवसेना आणि मनसे असा वाद पहायला मिळत आहे.

Share