Jayant Patil ; जयंत पाटलांच नागपूर अधिवेशनापर्यंत निलंबन

नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता.

नेमकं काय झालं?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पुरवणी मागण्यांवर भाषण करतील असे म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चौथ्यांदा सभागृह तहकूब केले असेही विरोधकांनी म्हटले. यावेळी जयंत पाटील यांनी हे बरोबर नाही, तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले.

दरम्यान, जंयत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विरोधीपक्षाकडून सभात्याग करण्यात आला. काही घडू नये याची काळजी आम्ही घेत असतो. या संदर्भात सर्वांना विनंती केली. सकाळपासून चर्चा सुरु आहे. भास्कर जाधव यांना बोलू द्या, असं आम्ही सांगत होतो. सगळ्यांचा मान ठेवण्याचा मान आम्ही ठेवला आणि तुम्ही ही ठेवला. तुम्ही निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांच्याकडून जे घडलं त्या संदर्भात मी दिलगिरी व्यक्त करतो. निलंबन मागे घ्या यासाठी नाही तर जे घडलं त्यासंदर्भात, असे अजित पवार म्हणाले.

Share