दिल्ली तर दूरच मात्र महाराष्ट्रातही चौथ्या क्रमांकावर उपाध्येंचे टिकास्त्र

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी काल शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली कबीज करु अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. यावर आता भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं की, दिल्ली तर दुरच मात्र महाराष्ट्रातही पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. असं ट्विट उपाध्ये यांनी केलं आहे.

उपाध्यें यांनी ट्विटमध्ये एका बातमीची लिंक शेअर करत म्हंटलं आहे की, ही बातमी आहे २४ जानेवारी २०१४ ची तीच भाषा तीच वाक्ये. ७ वर्षे उलटली. दिल्ली तर दूरच, महाराष्ट्रातही पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला. शिवबंधनाचे किती धागे तुटले, किती तलवारी म्यान झाल्या, किती निष्ठावंत दुरावले हेही पहा. अशी खोचक टिका त्यांनी ट्विट करत म्हंटली आहे.

 

 

Share