अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात अखेर केतकी चितळेला जमीन मंजूर

ठाणे : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, न्यायालयानं आज तिला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

काय होत प्रकरण?

केतकीने १ मार्च २०२० मध्ये एक पोस्ट व्हायरल केली होती. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीविरोधात ही कारवाई केली होती. या वादग्रस्त पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केल्याने ती पोस्ट अधिक व्हायरल झाली होती. नवबौद्ध लोक ६ डिसेंबरला मुंबई दर्शनास येतात अशा पध्दतीची पोस्ट तिने सोशल मीडियावरती शेअर केली होती आणि नवबोध्द या वाक्याचा संदर्भ देत स्वप्रिल गोविंद जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरूनच आता केतकीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं तिला कोठडी मुक्कामी धाडलं होतं. तसेच एका समाजाची लोक मोफत आणि मुंबई पाहायला मिळते म्हणून येतात अशी पोस्ट केतकीने केली होती आणि तिच्या याच पोस्टवर सडकडून टीका झाली होती. यानंतर केतकीविरोधात आक्रमक वातावरण तयार झाले होते.

Share