एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर जाणून घेऊयात हे नवीन बदल होणार

देशातली सर्वात मोठी हाऊसिंग डेवलपमेंट फाइयन्स कंपनी म्हणजेच एचडीएफसी लिमिटेड एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे.कॉर्पोरेट विश्वातल हे सर्वात मोठ विलीनीकरण आहे. हे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर एचडीएफसी बँकेत १०० टक्के हिस्सेदारी पब्लिक शेअर होल्डर्सची असेल.त्याचबरोबर  शेयरधारकाना  एचडीएफसी लिमिटेडच्या २५ इक्विटी शेअरच्या मोबदल्यात एचडीएफसी बँकचे ४२ इक्विटी शेअर मिळतील. विलीनीकरणाच्या बातमीने मार्केटमध्ये उत्साहाच वातावरण बघायला मिळल त्यामुळे एचडीएफसी लिमिटेड एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी अनुक्रमे ९.९७ टक्के आणि ९.३० टक्कयांची मूल्यवाढ साधली. याचा फायदा शेअर होल्डर्स होणार आहे एचडीएफसी बँकेत गुंतवणूक वाढण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे हे विलीनीकरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदाशीर ठरू शकते .

या विलीनीकरणानंतर सरकारी बँके पाठोपाठ एचडीएफसी बँक देशातली दुसरी मोठी बँक बनेल तर देशातली तिसरी मोठी बँक आयसीआयसीआयच्या तुलनेत एचडीएफच आकारमान आता दुप्पट असेल, देशातील टीसीएस आणि रिलायन्सला सारख्या मोठ्या कंपन्यानाही ही बँक मागे टाकेल. या बँकेत संस्थागत विदेशी गुंतवणूकदारांनाही गुंतवणूक करण्यासाठी वाव मिळेल.

रीयल इस्टेट रेग्युलेटरी अँक्ट (RERA) लागू झाल्याने हाऊसिंग सेक्टरला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा मिळालाय आणि सरकारने अफोर्डेबल हाउसिंग सेक्टरमध्ये पुढाकार घेतल्याने हाऊसिंग सेक्टर तेजीत येऊ शकते त्यामुळे एचडीएफसी बँकेचा हाऊसिंग लोनचा पोर्टफोलियो मजबूत होईल.  कृषि,होम लोन आणि अन्य क्षेत्रातही किफायतीशीर दरात कर्ज उपलब्ध करू दिले जाईल. त्यामुळे या कंपनीला  आता शहरी, अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात जलद गतीने विस्तार करायला मदत मिळेल. आता ग्राहकांना एका छताखाली बँकिंग आणि नॉन बँकिंग या सगळ्या सुविधा किफायतीशीर दरात मिळतील

https://fb.watch/cemeygZqbC/

Share