सारखे नकारात्मक विचार डोकं खराब करतात; त्या स्थितीत अशा गोष्टी जाणीवपूर्वक करा

जीवनात नकारात्मक भावना येणं ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु नकारात्मकता दीर्घकाळ तुमच्या मनात राहत असेल तर त्याच्यामुळे शारीरिक समस्या आणि मानसिक विकारही होऊ शकतात. इतकेच नाही तर नकारात्मक तुमच्या यशाचा मार्गही रोखू शकतात. हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचार आणि भावना सोडून देण्याचे ट्रेनिंग देऊ शकता.

क्षमाशीलतेवर आधारित ‘हो’ओपोनोपोनो या प्राचीन जीवन तत्त्वज्ञानात याबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. हो’ओपोनोपोनो’ तज्ज्ञ डॉ. करिश्मा आहुजा यांनी नकारात्मक मानसिकतेवर मात करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, याची माहिती दिली आहे.

तुमचा मूड चिडचिडा होऊ लागला असेल राग, चिंता किंवा निराशा याकडं वळू लागला की लगेच थांबा. शांत बसा, काहीसा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असल्यास, चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडू शकता. काही वेळ चाला किंवा शांत आणि रिलॅक्स करणारं संगीत देखील ऐकू शकता. तुमच्या या स्टेप्स नकारात्मकता घालवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

जेव्हा चिंता, भीती, राग, अपराधीपणा किंवा लाज या गोष्टी तुमच्या मनात येऊ लागतात, तेव्हा क्षणभर थांबा आणि अशा निगेटिव्ह गोष्टींना मनावर ताबा मिळवून देऊ नका. नकारात्मक विचार दूर होईपर्यंत अशा प्रकारे स्वतःशी बोलत रहा. यामुळे तुम्ही कमी नकारात्मक भावना अनुभवाल.

 

दोष-टीका करण्यात एक क्षणही वाया घालवू नका –

दोष आणि टीका करण्यात एक क्षणही वाया घालवू नका. काय चांगले झाले याबद्दल 5 वाक्ये बोला. जे चांगले झाले नाही त्याबद्दल फक्त एकच वाक्य बोला. डॉ. करिश्मा यांच्या मते, तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टींनी दुःखाला आमंत्रण देता. म्हणून बोलतानाही नेहमी पॉझिटिव्ह शब्द वापरा. त्यामुळे तुमच्या मन:स्थितीत झपाट्याने सुधारणा होईल. ‘मला हे असलं आवडत नाही, मला हे करायचे नाही, अशा शब्दांऐवजी मला काहीतरी चांगले करायचे आहे, असं म्हणा.

मौन धारण करणं –

प्रत्येक परिस्थिती एक धडा घेऊन येते. जर काही ठीक होत नसेल तर, शांत बसा आणि शक्य तितक्या चांगल्या प्रकारे परिस्थितीला कसे सामोरे जावे याचा विचार करा. दररोज काही वेळ मौन धारण करणं, तुम्हाला स्वतःशी अधिक कनेक्ट होण्यास मदत करेल.

Share