आचारसंहिता म्हणजे काय ? कोणत्या गोष्टींवर लागते बंदी ?

लोकसभा निवडणुकांची तारीख आज दुपारी जाहीर होईल. आणि आजपासूनच आचारसंहिता लागू होईल, जी निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहील. लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशात तर विधानसभा निवडणुकीदरम्यान संबंधित राज्यात आचारसंहिता लागू होते. निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुक 2024 च्या तारखा जाहीर करणार आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच आचारसंहिता लागू होते, आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते.

आचार संहिता लागू झाल्यावर काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार हा सर्वसामान्य नागरिकांना पडणारा प्रश्न असतो. आचार संहिता लागू झाल्यावर प्रामुख्याने पेंशनची कामे, जाती प्रमाण पत्र बनवण्याची कामे, आधारकार्ड तयार करण्याची कामे, सार्वजनिक वीज पुरवठा तसेक पाण्यासंबंधी कामे, साफसफाई संबंधी कामे, वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणे, रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे, सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प, सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या आराखड्याची कामे आदि बाबी या सुरू राहणार आहेत.तर आचारसंहिता काळात सार्वजनिक उद्घाटनाचे कार्यक्रम, भूमिपूजन बंद राहणार आहेत. तसेच नव्या कामांचा स्वीकार करता येणार नाही. सरकारी कामांचे होर्डिंग्ज, फ्लेक्स, बोर्ड लावता येणार नाही. जी बोर्ड या पूर्वी लावली असतात, ती काढावी लागतात. अथवा कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती झाकावी देखील लागतात. मतदार संघांत राजकीय दौरे आयोजित करता येत नाही. सरकारी वाहनांना सायरन लावला जात नाही.समाज माध्यमांनवर पोस्ट करताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे. थोडी चूक सुद्धा जेलमध्ये पाठवू शकते. त्यामुळे पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करावा लागणार आहे. कोणत्याही नेत्याचा प्रचार करतांना आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

निवडणूक आयो सरकारी वाहनांना सायरन लावला जात नाही. शासकीय भवन, कार्यालयात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो लावता येत नाही. जी लावली असेल ती काढून टाकली जातात. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर माध्यमांत सरकारी जाहिराती देता येणार नाहीत. लाच खोरांवर कठोर कारवाई. गाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च उमेदवारांना करावा लागतो. तसेच उमेदवारी सादर करतांना संपत्ती आणि खर्चाचा तपशील देखील जाहीर करावा लागतो.

Share