मुंबईः पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ७ वाजता ईडीचे पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राऊत यांच्या घरी ईडी पोहोचल्यानंतर भाजप नेत्यांकडून राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. “माफिया संजय राऊत यांना आता हिशेब द्यावा लागणार”, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत को हिसाब तो देना पड़ेगा pic.twitter.com/r5bPETWsV6
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 31, 2022
किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला की, १२०० कोटी रुपयांचा पत्राचाळ घोटाळा असो. वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र लुटण्याचा उद्योग सुरू होता. माफियागिरी, दादागिरी करत प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. आता या सगळयाचा हिशेब माफिया संजय राऊत यांना द्यावा लागणार, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर टीका केली आहे.