घरच्या घरी बनवा मसाला दूध, जाणून घ्या रेसिपी…

कोजागरी पौर्णिमेला धार्मिकरित्या महत्त्वाचे स्थान असल्यामुळे साहजिकच ही पौर्णिमा दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी ०९ ऑक्टोबर म्हणजेच आज रात्री कोजागरीचा पूर्ण चंद्र आकाशात पाहायला मिळणार आहे. या रात्रीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोजागरीला केले जाणारे दुधाचे नैवैद्य. चला तर मग कोजागरीसाठी मसाला दूध बनवण्यासाठी जाणून घ्या रेसिपी.

साहित्य :

– विलायची-६ किंवा अर्धा चमचा

– केशर- ४० ते ५०

– गाईच्या दुधात तूप मिसळून – १  लिटर

– साखर – कप (१०० ग्रॅम)

– बासमती तांदूळ – कप (५० ग्रॅम)

– मनुका – अर्धा टिस्पून

– बदाम – १०

– काजू – १०

कृती :

– सुरवातीला १ लिटर दूध मंद आचेवर गरम करा. दूध गरम असताना बदाम आणि काजूचे लहान तुकडे करा. ७ ते ८ बदाम आणि १० ते १२ काजू कापून घ्या.

– हिरव्या वेलचीची पावडर बनवा. तांदूळ धुतल्यानंतर ते अर्धा तास पाण्यात भिजवा.

– दुधाला उकळी येताच त्यात तांदूळ घाला आणि थोड्या वेळाने ढवळत राहा.

– १५ मिनिटांनंतर, खीरमध्ये बारीक केलेलं काजू आणि बदाम घाला, आता मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजवा. खीर घट्ट झाल्यावर त्यात केशर मिश्रित दूध घाला.

– यानंतर, वेलची पावडर टाकल्यानंतर, नीट ढवळून घ्या आणि आणखी १० मिनिटे शिजवा.

– त्यात अर्धा कप साखर घाला. साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर २ मिनिटे शिजवा. अशा पध्दतीने खीर बनवून तयार झालीय.

Share