आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती…

मुंबई : शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं असून ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेनेच नाव देखील वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी, जिंकता तुम्हाला येत नाही. मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू, असंही अंधारे यांनी म्हटलं.

दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे. सध्या तरी ही निर्णय तात्पूरत्या स्वरुपाचं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.

संबंधित गट,त्यांना हवे असल्यास,त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात

दोन्ही गटांना ते निवडतील वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.

सध्याच्या पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत सादर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(i) त्यांच्या गटांच्या नावांना ज्याद्वारे आयोगा मान्यता देईल आणि त्यासाठी

प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या,त्यापैकी कोणीही असू शकतो.

(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

संबंधित गटामध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

त्यांच्या पसंतीचा क्रम,त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

Share