८ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना ईडीकडून अटक

मुंबई-  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ८ तासच्या चौकशी नंतर अखेर अटक केली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणीत वाढ  होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी पहाटे मलिकांना ईडीने ताब्यात घेतले होते.

मलिकांच्या एकूण चार मालमत्तांची चौकशी करण्यात सुरु होती. मलिकांच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरु होती. ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.

 

Share