ठाकरे सरकारला घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागेल, सोमय्यांचे ट्विट

मुंबईः  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीच्या व्यवहार प्रकरणी करण्यात आली. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आली. यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला आहे.

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Share