खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

साताराः भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतिफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

दिगंबर आगवणे यांनी  खासदार निंबाळकर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आगवणे यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीसोबतच सर्व आकडेवारी आणि पुरावे न्यायालयात सादर केले होते. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन त्यांच्याविरुद्ध भा.द.वि. ४०५, ४०६, ४१८, ४२०, ४६७, ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

Share