मलिकांचा दावा , महाविकास आघाडीच अव्वल !

मुंबई– राज्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूकीचे  निकाल आज जाहीर झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सर्वश्रेष्ठ पक्ष कोणता यात चढाओढ सुरु आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, महाविकास आघाडीला नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूकीत ८० टक्के मतदान केलं आहे , म्हणजेच राज्यातील नागरिकांनी भाजपला नाकारले आहे.

राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

 

 

Share