मंजुळेच्या ‘झुंड’ चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित

मुंबईः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदी चित्रपट झुंड या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. झुंड चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेनं यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागराजनं झुंड या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम केलंय, त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. आत्तापर्यंत मराठी अनेक चित्रपट हीट देणा-या मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटात वेगळे काय पाहायला मिळणार याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी देखील या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिग बी यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘आमची टीम तुम्हाला भेटायला येत आहे. झुंड चार मार्चला होणार प्रदर्शित’

Share