मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात

मुंबई : मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखले जाते. नुकतंच नेहा जोशी ही विवाहबंधनात अडकली आहे. नेहा जोशीने नुकतंच लगीनगाठ बांधली आहे. याचे तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र तिने कोणताही गाजावाजा न करता लग्न केले आहे.

अभिनेत्री नेहा जोशी हिने अभिनेता ओमकार कुलकर्णीसोबत १६ ऑगस्ट रोजी खासगी सेरमनीत लग्नबेडीत अडकली आहे. तिने लग्नाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, अखेर अडकले विवाहबंधनात तसेच नेहाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अंतरपाट पकडलेला असून ती कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की आयुष्यातील नवीन भूमिका.

नेहा आणि ओमकारने साधेपणाने लग्न केले असून मीडिया रिपोर्टनुसार, ते कोर्ट मॅरेज करून छोटेसे रिसेप्शन ठेवणार आहेत. नेहा आणि ओमकारच्या लग्नाच्या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री नेहा जोशीचा नवरा ओमकार कुलकर्णी हा मुळात एक लेखक, कवी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नेहा ३८ वर्षांची आहे, तर ओमकार तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे. ओमकार यापूर्वी एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापकही होता.अभिनेत्री नेहा जोशीने पोस्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Share