एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वानखेडे यांना एका ट्विटर हॅण्डलवरून ही धमकी देण्यात आली आहे.

मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणावेळी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. परंतु, समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट मिळाली. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे मुस्लीम नसल्याचा निर्वाळा दिला. यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलिस नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना धमक्या मिळत असल्याच्या आरोप करण्यात येत आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडेंना धमकी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी वानखेडेंनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Share