राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्याचा सश्रम कारावास

अचलपूर- राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ सालच्या प्रकरणावर चांदूरबाजार न्यायालयाने आज सुनावणी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चु कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या यंत्रणेकडून २०११ मध्ये ४२ लाख ४६ हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. बच्चू कडूंनी १९ एप्रिल २०११ रोजी त्या फ्लॅटचा ताबा घेतला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील त्या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगाला देणे टाळले होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत तक्रारदारांनी बच्चू कडूंकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार केली होती. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Share