मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

बंगळुरु : बॉलिवूडचा डिस्को डान्सर आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना बंगळुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने याबाबतची माहिती दिली आहे.

मिमोह चक्रवर्ती याने सांगितले की, मिथुन चक्रवर्ती यांना बंगळुरु येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर किडनीस्टोनची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बंगळुरुमधील रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. ते फीट आहेत, असेही मिमोहने सांगितले.

https://twitter.com/tweetanupam/status/1520297581842104321?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1520297581842104321%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2F%3Fp%3D174762preview%3Dtrue

भाजपचे माजी खासदार डॉ. अनुपम हाजरा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘मिथुन दा यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. गेट वेल सून मिथुन दा’, असे म्हटले आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मिथुन चक्रवर्ती यांची हेल्थ अपडेट समोर आल्यानंतर आता त्यांच्या लाखो चाहत्यांना हायसं वाटलं आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती उत्तम रहावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

चार दिवसांपूर्वी बॉलिवूडचे ज्‍येष्‍ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त समोर आले आहे. मिथुन चक्रवर्ती लवकर बरे व्‍हावेत, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

Share