मोदी सरकारचं बजेट म्हणजे ‘शून्य’, राहुल गांधी

नवी दिल्लीः  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प ठरला. सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडला. त्यावर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदी सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य बजेट असून त्यामधून कोणत्याही क्षेत्राला काहीही मिळाले नाही असे ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मोदी सरकारचे हे बजेट म्हणजे शून्य बजेट आहे. त्यामध्ये वेतनदार वर्ग, मध्यम वर्ग, गरीब आणि दुर्बल, युवक, शेतकरी आणि लघु, मध्यम उद्योगांना कोणताही फायदा झाला नाही.”

Share