भारताला आत्मनिर्भर,अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प-फडणवीस

मुंबई- आज देशाचा २०२२-२०२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना , तरुणांना रोजगाराच्या संधी तसेच आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीय यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

भविष्यासाठी फायदेशीर असणारा आणि आत्मनिर्भर भारत तयार करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.  हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे. शेती क्षेत्रात २.३७ लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद असल्याचेही फडणवीस म्हणाले आहे. सोबत शेतकऱ्यांना समर्पित करणारा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प देशाच्या हिताने योग्य आहे ,असं देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं आहे.

 

Share