इतका आदर्श सामाजिक न्यायमंत्री आजवर… भातखळकरांचा मुंडेंना टोला

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेवर करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले आहे. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला. यावर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्टिट करत निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर ट्वीट काय

इतका आदर्श सामाजिक न्याय मंत्री आजवर राज्याला लाभला नाही. असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्टिट करत लगावला आहे.

करुणा शर्मांचे आरोप काय?

करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली असून त्यांनी आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरु आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपरवल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत. असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले होते. परंतु रेणू शर्माने आपले सर्व आरोप मागे घेतले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला होता.

Share