मुंबई : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. यादरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
तब्बेतीच्या कारणामुळं शरद पवार मविआच्या सभेस्थळी उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारहे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Vikas Aghadi (MVA) to hold a protest in Mumbai today against the Eknath Shinde government and Maharashtra Governor BS Koshyari over his controversial remark on Chhatrapati Shivaji Maharaj. NCP chief Sharad Pawar will join the protest. https://t.co/4jZUEVPy6Y
— ANI (@ANI) December 17, 2022
दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.