शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय – संजय राऊत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रप्रेमींचा आज मोठा मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वीच सरकारचे पाय लटपटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रात सुरू आहे. या अपमानाला विरोध करणाऱ्यांची अडवणूक सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मोर्चाला परवानगी देताना विविध अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, भाषणांबाबतही अटी घातल्या आहेत. त्यावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने थेट भाषणच लिहून द्यायला हवी असे त्यांनी म्हटले. या सरकारमधील नेत्यांना भाषण लिहूनच दिली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.

राज्य सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमा अंश शिल्लक असेल तर त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. सत्तेत  असणाऱ्या लोकांमधील महाराष्ट्रप्रेमी हे खोक्याच्या वजना खाली दबले आहेत. संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाणे भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला आहे,असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

Share