मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस

मुंबई : मार्च २०२१ मध्ये बदली घोटाळ्यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेने देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्याबाबत आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी सांगितलं की मी चौकशीसाठी बीकेसी येथील सायबर पोलिसांत हजर राहणार आहे. मात्र माहिती आपल्याकडे कशी प्राप्त झाली याचा स्त्रोत योग्यवेळी जाहीर करु असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज विशेषता मी जे काही बोलणार आहे, त्याचा संदर्भ आपल्याला कल्पना आहे की  महाविकास आघाडी सरकारमधील गृहविभागातला महाघोटाळा मी मार्च २०२१ उघडकीस आणला होता. माझ्याकडे यासंदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेनड्राइव्ह सगळं माझ्याकडे आहे, हे सांगितलं होतं. ते देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय, हे म्हटलं होतं. त्यानुसार, जी काही घोटाळ्याची माहिती होती, ती सगळी माहिती त्याच दिवशी दिल्लीला गेलो आणि होम सेक्रेटरी यांना सगळी माहिती सादर केली होती. त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मा. न्यायालयाने यासंदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली आहे. बदल्यांसंदर्भातील घोट्ळ्याची चौकशी सीबीआय करतेय. अनिल देशमुखांची चौकशी होतेय. हे तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत. अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत. मात्र ज्यावेळी सीबीआयला चौकशी ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्याकरिता एफआयआर दाखल केला. ऑफिसिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली, असा एफआयआर दाखल केला. यासंदर्भात मला पोलिसांच्यावरीते प्रश्न पाठवण्यात आले. मी उत्तर दिलं होतं की, याची माहिती देईन. खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापि, मला पुन्हा एकदा प्रश्नावली पाठवण्यात आली आणि कोर्टात सांगण्यात आलं की मी उत्तर देत नाहीये. काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात, त्यांच्या एफआयआरच्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ पहिल्यांदा स्पष्ट करतो, विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही. उलट राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार आहे. कारण मी गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांनी चुकीची केस केली तरीही तपासात माझं सहाय्य मागितलंय म्हणून मी निश्चितपणे देईन. अपेक्षा एवढीच आहे, माहिती बाहेर कशी आली, याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, सहा महिने सरकारकडे अहवाल पडला होता. कुणी किती पैसे दिले, कोण कुठल्या जिल्ह्यात गेलाय, अशी संवेदनशील माहिती असताना, सरकारने काही कारवाई केली नाही. सरकारवर कारवाई झाली पाहिजे की, ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा प्रश्न आहे.

Share