दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी? शेलार

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरच आता भाजपचे आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे नेते अशिष शेलार यांनी  ट्विट करत म्हटलं आहे की, घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलवले की, राजकीय सुडबुद्धीने असे  तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!” असं आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय  गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सीक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे.
Share